Skip to content

वेताळ टेकडी माहिती मार्गदर्शन | Vetal Tekadi Information Guide in Marathi

  • by
टेकडीचे नाववेताळ टेकडी
ट्रेकिंगची सोपेपणा-कठीणपणाची पातळीसोपी
टेकडीचे ठिकाणपुणे
टेकडीची वेळ
ट्रेकिंग ला लागणारा वेळ१ तास

वेताळ टेकडी माहिती मार्गदर्शन | Vetal Tekadi Information Guide in Marathi

Vetal tekadi also called as Vetal Hill, ARAI Tekadi and ARAI Hill.

वेताळ टेकडी संक्षिप्त माहिती Vetal Tekadi Short Information पुणे शहर हे तसे गजबजलेले शहर. याच पुणे शहराच्या मध्यभागी अतिशय सुंदर अशी निसर्गरम्य टेकडी आहे. ही टेकडी अजूनही बऱ्याच जणांना माहीत नाही. टेकडीवर फिरताना आपण पुण्यात नसून, पुण्याच्या बाहेर कुठेतरी निसर्गरम्य वातावरणात फिरायला आलेलो आहोत असा भास होतो. तर याच टेकडीची माहिती मी तुम्हाला देणार आहे. या टेकडीला Vetal TekadiS किंवा वेताळ टेकडी असेही म्हणतात.

वेताळ टेकडी पाहण्यासारखी ठिकाणे | Places To See Vetal Tekadi

  1. पायवाट आणि डांबरी रोडमार्ग
    या टेकडीवर येण्यासाठी मुख्यत दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे पायवाट आणि दुसरा मार्ग म्हणजे डांबरी रोड ने .पहिला मार्ग म्हणजे पायवाट : ही टेकडी पुण्याच्या मध्यभागी असल्यामुळे तुम्ही चारही दिशांनी म्हणजेच ( कोथरूड, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, पाषाण ) अशा ठिकाणांवरून पाय वाटेने टेकडी वरती येऊ शकता.आणि दुसरा मार्ग म्हणजे डांबरी रोड ने : पौड रोड, केळेवाडी मार्ग हा फक्त एकच मार्ग आहे. या एकाच मार्गाने तुम्ही बाय रोड टेकडीवरती येऊ शकता याशिवाय अन्य दुसरा कोणताही डांबरी रोड मार्ग नाही. नळ स्टॉप वरून सरळ पुढे आल्यावर उड्डाण पुलावरून खाली उतरल्यावर पहिला सिग्नल लागेल. येथे सिग्नलला पौड रोड दुर्गा माता मंदिर लागते. या ठिकाणी लागूनच असलेल्या रोडने केळेवाडी वस्ती आहे. तेथून उजव्या बाजूला डांबरी रोड ने आपल्याला सरळ वरती जायचे आहे. सरळ वर गेल्यावर आपल्याला टेकडीचे सिक्युरिटी गेट लागते.

  2. हनुमानाचे छोटे मंदिर

    काही लोक येथे बाजूला गाडी पार्क करून येथूनच ट्रेक सुरू करतात. तर काही लोक येथून सरळ जाऊन टेकडीच्या वर गेल्यावरती ट्रेक चालू करतात. येथे वरतीच सुंदर असे हनुमानाचे छोटे मंदिर आहे. येथूनच पुढे तुम्ही पाय वाटेने वेगवेगळ्या मार्गांनी टेकडीवरती भटकंती करू शकता.

  3. पुणे शहराचे सुंदर असे दृश्य
    त्या मंदिरातून खाली येताना आपल्याला पुणे शहराचे सुंदर असे दृश्य पाहायला मिळते.

  4. एमआयटी कॉलेज
    सिक्युरिटी गेटमधून पुढे गेल्यावर एमआयटी कॉलेज सुद्धा दिसते. हे जे घुमट दिसते आहे तेच एमआयटी कॉलेज आहे.

  5. पटांगण
    पुढे आल्यावर आपण टेकडीच्या वर येतो येथे पटांगण लागते. या पटांगणात तुम्ही तुमची गाडी लावून पुढे भटकंती करू शकता.

  6. ARAI पार्किंग, ARAI कंपनी
    ARAI कंपनीजवळ असलेल्या पार्किंग मध्ये गाडी पार्क करून ट्रेकिंग ला सुरुवात करू शकता.
    ही जी समोर दिसते आहे तीच ARAI म्हणजे Automotive Research Association of India कंपनी आहे. ज्यामुळे या टेकडीला Vetal Tekadi असे म्हणतात.

  7. टेकडीचे मुख्य प्रवेशद्वार

    येथून उजव्या बाजूला गेल्यावर आपल्याला टेकडीचे मुख्य प्रवेशद्वार लागते.

  8. ओपन जिम, छोटेसे हनुमानाचे मंदिर, व्यायामासाठी असलेला कट्टा

    तेथून आत गेल्यावर आपल्याला ओपन जिम दिसते, ओपन जिमच्या शेजारीच छोटेसे हनुमानाचे मंदिर, आणि हनुमानाच्या मंदिरासमोरच बसण्यासाठी आणि व्यायामासाठी असलेला कट्टा पहावयास मिळतो.
    येथे सकाळी आणि संध्याकाळी बरीच लोकं व्यायामासाठी येतात यामध्ये सर्व वयोगटातील लोक असतात. ज्यामध्ये नेहमी टेकडीवरती व्यायामासाठी येणारा मित्रमंडळींचा समूह, पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण / तरुणी. शाळा कॉलेजची मित्रमंडळी, छोटीशी सहल म्हणून आलेले कुटुंब, पाळीव प्राण्यांना फिरवण्यासाठी घेऊन आलेली माणसे आपल्याला पहावयास मिळतात.

  9. वेताळ बाबा मंदिर

    येथून थोडेसे वर गेल्यावरती आपल्याला एक डावीकडे आणि उजवीकडे जाणारा रस्ता दिसतो. डावीकडे जाणारा रस्ता आपल्याला वेताळ बाबा मंदिराजवळ नेतो. तर उजवीकडचा रस्ता आपल्याला दगडाच्याखाणीकडे नेतो.
    ह्याच वेताळ बाबाच्या मंदिरामुळे या टेकडीला वेताळ टेकडी असेही म्हणतात.

  10. दगडाची खाण / पाण्याचे तळे, पक्षी


    वेताळ मंदिर पाहिल्यानंतर बाजूच्या रोडनी सरळ गेल्यावर आपण खाणीचा रोडला येतो.
    हे जे समोर डोंगराच्या मध्यभागी भव्य तळ्यासारखे दिसते आहे ही खाण आहे म्हणजे पूर्वी येथे दगडाची खाण होती. आता त्यामध्ये पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
    या तळ्यामध्ये तुम्हाला पान कोंबड्या, त्यांची पिल्ले, टिटवी, चिमण्या, कावळे, बगळे, सुतार पक्षी असे वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात.
    येथे खाणीच्या वरती बसल्यावर समोर खोलवर दिसणारे पाणी, पक्ष्यांचा किलबिलाट, दिसणारा मावळतीचा सूर्य, ढग आणि मस्तपैकी अंगाला स्पर्श करून जाणारी वाऱ्याची झुळूक यामुळे मन अगदी प्रसन्न होऊन जाते. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून अशा प्रकारच्या वातावरणात आल्यामुळे माणूस अगदी तणाव मुक्त होऊन जातो. शनिवार रविवार टेकडी गजबजलेली असते. पुढे गेल्यावर खाणीच्या खाली तळ्यामध्ये जायला तुम्हाला रस्ता मिळतो आणि येथे तुम्ही जाऊन बसू शकता.

  11. मोर

    टेकडीच्या बाजूला असणाऱ्या झुडपांमध्ये आपल्याला मोर सुद्धा पहावयास मिळतात आणि पावसाच्या वातावरणामध्ये त्यांचे थुई थुई नाचणे पाहून मन खुलून येते. त्यांचा म्याऊऊ असा आवाज सुद्धा आपल्या कानी पडत राहतो.

  12. शहरी दृश्य
    येथूनच थोडसं पुढे गेल्यावर आपल्याला पुणे शहराचा काही भाग टेकडी वरून खूप सुंदर दिसतो. संध्याकाळी उशिरापर्यंत थांबलो तर चमकणाऱ्या लाइटिंग मुळे अजूनच आकर्षित दिसतो. संध्याकाळचा वेळेला कधीकधी ससे सुद्धा पहावयास मिळतात.

वेताळ टेकडीवर कसे जायचे ? How to go to Vetal Hill?

  • पायवाट
    ही टेकडी पुण्याच्या मध्यभागी असल्यामुळे तुम्ही चारही दिशांनी म्हणजेच ( कोथरूड, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, पाषाण ) अशा ठिकाणांवरून पाय वाटेने टेकडी वरती येऊ शकता.

  • दुसरा मार्ग म्हणजे डांबरी रोड ने
    पौड रोड, केळेवाडी मार्ग हा फक्त एकच मार्ग आहे. या एकाच मार्गाने तुम्ही बाय रोड टेकडीवरती येऊ शकता याशिवाय अन्य दुसरा कोणताही डांबरी रोड मार्ग नाही. नळ स्टॉप वरून सरळ पुढे आल्यावर उड्डाण पुलावरून खाली उतरल्यावर पहिला सिग्नल लागेल. येथे सिग्नलला पौड रोड दुर्गा माता मंदिर लागते. या ठिकाणी लागूनच असलेल्या रोडने केळेवाडी वस्ती आहे. तेथून उजव्या बाजूला डांबरी रोड ने आपल्याला सरळ वरती जायचे आहे. सरळ वर गेल्यावर आपल्याला टेकडीचे सिक्युरिटी गेट लागते.

वेताळ टेकडीचा नकाशा | Vetal Tekadi Map / गुगल नकाशा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत