Skip to content

शनिवार वाडा माहिती मार्गदर्शन | Shaniwar Wada Information Guide in Marathi

  • by
किल्ल्याचे नावशनिवार वाडा
ट्रेकिंगची सोपेपणा-कठीणपणाची पातळीसोपे
किल्ल्याचे ठिकाणपुणे
पायथ्याजवळचे गावशनिपार
किल्ल्याची वेळ9:30 ते 5:30
ट्रेकिंग ला लागणारा वेळदीड ते दोन तास
प्रवेश शुल्कभारतीयांसाठी ₹20 प्रति व्यक्ती.

शनिवार वाडा माहिती मार्गदर्शन | Shaniwar Wada Information Guide in Marathi

शनिवार वाडा संक्षिप्त माहिती शनिवार वाडा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक पुरातत्त्व असा पेशवेकालीन वाडा आहे. हा वाडा थोरला बाजीराव पेशवा यांनी 1732 मध्ये बांधला आणि हाच वाडा पुढे पेशव्यांचे मुख्य राहण्याचे ठिकाण झाले. देश-विदेशातील महाराष्ट्रातील भरपूर नागरीक शनिवार वाड्याला भेट देण्यासाठी नेहमी येतात. म्हणून येथे नेहमीच लोकांची वर्दळ पाहायला मिळते शनिवार वाडा हा पुणे शहराच्या रहदारीच्या मध्यवर्ती भागात शनिपार येथे अतिशय डौलदार पणे उभा असलेला आपल्याला पहावयास मिळतो.शनिवार वाड्याच्या आतमध्ये बागा जसे चिमण बाग, विहीर, नोकरांची राहण्याची व्यवस्था आणि अर्थातच पेशवे घराण्यातील व्यक्तींची निवासस्थाने असे सर्व वास्तू घटक होते. 18 वे शतक भर शनिवार वाड्यात नवीन बांधकामे जुन्याची डागडुजी होत राहिली जसे की तट, बुरुज, दरवाजे, दिवाणखाने, कारंजे, पाण्याचे हौद. 19 व्या शतकाच्या सुरुवातीस शनिवार वाडा आगीत भस्मसात झाला आणि या सर्व इमारतींचे फक्त अवशेष उरले त्याच्या आकाराची कल्पना आता फक्त जोते, पाच दरवाजे व नऊ बुरुज असलेल्या भोवतालच्या तटाच्या भिंती आणि तळ खड्ड्यांच्या आकारावरून आणि अस्तित्वात असलेल्या इतर काही तत्कालीन वाड्यावरून येऊ शकते.

शनिवार वाडा पाहण्यासारखी ठिकाणे

  1. पार्किंग

    शनिवार वाड्याच्या बाहेरील बाजूला उजवीकडे आणि डावीकडे गाडी पार्क करण्याची सोय आहे. येथे तुम्ही तुमचे वाहन पार्क करू शकता गाडी लावण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही.

  2. भिंती आणि बुरुज

    शनिवार वाडा बाहेरून पाहिल्यास चारही बाजूंनी भिंती आणि बुरुज तटबंदी आपल्याला पाहायला मिळते.

  3. दिल्ली दरवाजा मुख्य प्रवेशद्वार

    बाहेरील गेटमधून आत मध्ये आल्यावर आपल्याला शनिवारवाड्याचा मुख्य प्रवेशद्वाराचे दर्शन घडते.याच दरवाज्याला दिल्ली दरवाजा असेही म्हणतात. बाहेरून पाहिल्यावर हे मुख्य प्रवेशद्वारच आपल्याला आकर्षून घेत असते. प्रवेशद्वार याच्यावर असणारी नक्षी लोखंडी सुळके पाहण्यासारखे आहेत.

  4. पहिला बाजीराव पेशवा भव्य मूर्ती

    अगदी शनिवार वाड्याच्या समोरच पहिला बाजीराव पेशवा यांची भव्य सुरेख घोड्यावर बसून हातात भाला घेतलेली अशी मूर्ती आहे.

  5. बटाट्या मारुती, वाड्यासमोरील मोकळ्या जागेत बाजार

    शनिवार वाड्यासमोर मोकळ्या पटांगणात बाजार भरायचा बाजारामध्ये आलेला माल इकडे तिकडे पडलेला असायचा कुठे कांदा तर कुठे बटाटा असायचा याच बटाट्यामध्ये मारुती आधीपासूनच होता. नावं ठेवणे हा पुणेकरांचा तेव्हाही स्वभाव होता. मग तोही त्यातून कसा सुटेल बरे? मग वज्रासमान मारुतीही बटाट्याचा मारुती झाला.

  6. मूर्तीच्या डावीकडे आणि उजवीकडे बसण्यासाठी असलेली व्यवस्था

    मूर्तीच्या अगदी डावीकडे आणि उजवीकडे लोकांना बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. येथे भरपूर प्रमाणात झाडे आहेत येथे तुम्हाला उन्हाचा त्रास होत नाही गारवा जाणवतो आणि तुम्ही भव्य अशा शनिवार वाड्याचे दृश्य येथून डोळे भरून पाहू शकता.

  7. प्रवेश शुल्क, आणि प्रवेश

    येथे तुम्हाला क्यू आर स्कॅन करून माहिती भरून प्रति व्यक्ती ₹20 प्रवेश शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. जर कसे भरायचे कळत नसेल तर सिक्युरिटी गार्ड तुम्हाला मदत करतील. अशा प्रकारे ऑनलाईन तिकीट तुमच्या मोबाईल वरती येईल स्कॅन करून तुम्हाला आतमध्ये प्रवेश करता येतो.

  8. प्रवेशद्वारावरील नगारखाना

    आतमध्ये प्रवेश केल्यावर दिल्ली दरवाजाच्या पाठीमागच्या बाजूने पायऱ्यांनी तुम्हाला प्रवेशद्वाराच्या वर जाता येते. येथून तुम्ही शनिवार वाड्याच्या आतील आणि बाहेरील दृश्य पाहू शकता. आतमधील सुंदर दृश्य पाहून मन प्रसन्न आणि फुलून जाते.आलेल्या पर्यटकांनानगारखाण्यापाशी सेल्फी आणि फोटो काढायचे मोह आवरत नाही त्यामुळे येथे लोकांची गर्दी होते.नगारखाण्याला लागूनच तटबंदी चौकोनी आकारात आहे. त्यावरून तुम्ही चालत जाऊन फेरी पूर्ण करू शकता आणि शनिवार वाड्याच्या आतील आणि बाहेरील दृश्य पाहू शकता. हा परिसर खूप मोठा असल्यामुळे पूर्ण फेरी करण्यास वेळ लागतो. शनिवार वाड्याच्या उजव्या तटबंदीवरून लाल महाल सहजपणे दिसतो. या तटबंदीवर जाण्यासाठी आतमधील बाजूने भरपूर ठिकाणी तुम्हाला पायऱ्यांची व्यवस्था दिसेल.

  9. दरवाजे


    पाच दरवाजांपैकी दोन दरवाजे पूर्वेस दोन दरवाजे उत्तरेस आणि एक दरवाजा दक्षिणेस आहे. 1. मुख्य दरवाजा हा दिल्ली दरवाजा असून. 2. मस्तानी दरवाजा ( याला नाटक शाळेचा दरवाजा असे म्हणत.पहिल्या बाजीराव यांची पत्नी मस्तानी यांच्या मृत्यूनंतर त्या नावाचा दरवाजा “मस्तानी दरवाजा” म्हणून ओळखला जाऊ लागला. ) 3. खिडकी दरवाजा ( कवठी दरवाजा जवळ असलेल्या कवटीच्या झाडामुळे त्याला कवटी दरवाजा म्हणत असत. हा दरवाजा बहुतांशी बंद असे त्यातील लहान दिंडी दरवाजा मधून येण्या जाण्याचा रस्ता होता. ) 4. गणेश दरवाजा 5. नारायण दरवाजा ( जांभूळ दरवाजा हा दरवाजा जांभळाच्या झाडाच्या जवळ असल्यामुळे त्याला जांभूळ दरवाजा असे म्हणत.) हे इतर दरवाजे आहेत.

  10. इतिहास माहिती

  11. पेशव्यांची वंशवेल

  12. पुष्करणी

    भोजनाच्या जागे समोर असणारी ही भव्य पुष्करणी त्यातील कारंजे हे प्रमुख आकर्षण होते.

  13. हजारी कारंजे

    हे कारंजे सवाई माधवराव पेशव्यांच्या करमणुकीसाठी अतिशय कलात्मक रित्या तयार केले होते.

  14. विहीर व रहाट

    वाड्या साठी ही विहीर पाण्याचा मुख्य स्त्रोत होती त्यावर बसवलेल्या रहाटणीने पाणी उचलले जात असे.

  15. निवासस्थान,दालन, महाल अवशेष
    आठ तोटीचा कारंजे, हौद

  16. आरसे महाल

    1827 मध्ये वाड्याला लागलेल्या भीषण आगी मधूनही वाचलेली ही वास्तू नंतरच्या काळात दुर्लक्ष झाल्यामुळे हा सुंदर वारसा नष्ट झाला.

  17. गणपती रंग महाल

    शनिवार वाड्याचा आराखडा एकदम साधा असला तरी दिवाणखाना मध्ये सुंदर कोरीव बांधकाम केले होते. या दिवाणखान्याला त्यावेळी गणपती रंगमहाल असे म्हणत याचे बांधकाम आणि रचना बाळाजी बाजीराव पेशव्यांनी स 1755 मध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी केले.

शनिवार वाडा कसे जायचे ?

  • खाजगी वाहनाने / सार्वजनिक वाहतूक
    खाजगी वाहनाने किंवा बसने तुम्ही शनिपार पर्यंत जाऊ शकता. तेथून शनिवार वाडा जवळ आहे.

शनिवार वाडा नकाशा / गुगल नकाशा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत