किल्ल्याचे नाव | तिकोना किल्ला |
---|---|
समुद्रसपाटी पासून उंची | ३८५० |
किल्ल्याचा प्रकार | गिरिदुर्ग |
ट्रेकिंगची सोपेपणा-कठीणपणाची पातळी | मध्यम |
किल्ल्याचे ठिकाण | पुणे |
पायथ्याजवळचे गाव | तिकोनापेठ |
किल्ल्याची वेळ | |
ट्रेकिंग ला लागणारा वेळ | पायथ्यापासून 45 मिनिटे ते एक तास |
प्रवेश शुल्क | |
राहण्याची सोय | गुहेमध्ये पावसाळा सोडून इतर सर्व ऋतूत १० ते १५ जण राहू शकतात |
जेवणाची सोय | गडावर अन्न नाही, स्वतःचे आणा |
पाण्याची सोय | गडावर पिण्याच्या पाण्याची टाकं वर्षभर उपलब्ध आहेत. |
तिकोना किल्ला माहिती मार्गदर्शन | Tikona Fort Information Guide in Marathi
तिकोना किल्ला संक्षिप्त माहिती मुंबई-पुणे हमरस्त्यावरून आपल्याला सहज दिसणारे लोहगड आणि विसापूर हे किल्ले सर्वांना माहीत आहेत. पण याच किल्ल्यांच्या मागे, पवन मावळ प्रांतात, तिकोना ( वितंडगड) नावाचा एक किल्ला आहे ज्याची आपण ओळख करून घेणार आहोत.
लोहगड आणि विसापूर यांच्या मागे असल्यामुळे थेट नजरेला न पडणारा हा किल्ला, द्रुतगती महामार्गावरून सहज दृष्टीक्षेपात येतो. बोरघाट चढून गेल्यावर आपल्याला कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी पाहायला मिळतात. या प्राचीन बौद्ध लेण्यांच्या सुरक्षिततेसाठीच लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना हे किल्ले बांधले गेले होते. प्राचीन बंदरांना घाटमाथ्याशी जोडणाऱ्या अनेक घाटवाटा या परिसरातून जात होत्या आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती.
या परिसरातील बौद्ध लेणी बौद्ध आणि हिनयान पद्धतीची असल्यामुळे, अंदाजे ८०० ते १००० या काळात या किल्ल्यांची बांधणी झाली असेल असे मानले जाते.
तिकोना किल्ला पाहण्यासारखी ठिकाणे
गड प्रवेशद्वार
गडावर प्रवेश केल्यानंतर डावीकडे वळा. थोड्या अंतरावर तुम्हाला पाण्याचे टाके आणि एक गुहा दिसतील. या गुहेत 10 ते 15 लोकांना राहण्याची सोय आहे. पण पावसाळ्यात पाणी भरल्याने गुहा राहण्यास योग्य नसते.बालेकिल्ला
गुहेच्या बाजूने वर जाणारी वाट तुम्हाला थेट बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाते. प्रवेशद्वाराच्या पायऱ्या खूप उंच आणि थकवणार्या आहेत.पाण्याची टाकी आणि तटबंदीचा बुरुज
दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवीकडे पाण्याची टाकी आणि डावीकडे तटबंदीचा बुरुज दिसतो. थोडं सरळ वर गेल्यावर उजवीकडे उतरणारी एक वाट आहे. येथे तुम्हाला काही पाण्याची टाकी आढळतील.महादेव मंदिर
येथून तुम्ही मागे फिरून सरळ वाटेवर या. ही वाट तुम्हाला काही तुटलेल्या पायऱ्यांपर्यंत घेऊन जाते. येथून वर गेल्यावर समोरच तुम्हाला महादेवाचे मंदिर दिसतील. मंदिराच्या मागे पाण्याचा मोठा खंदक आहे.ध्वजस्तंभ
खंदकाला वळसा घालून तुम्ही ध्वजस्तंभाच्या जागी पोहोचाल.किल्ला दृश्ये
बालेकिल्ल्यावरून तुम्हाला समोरच उभा असलेला तुंग, लोहगड, विसापूर, भातराशीचा डोंगर, मोर्सेचा डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवनेचा परिसर आणि फागणे धरण हे सर्व न्याहाळता येतील. गडावरून संपूर्ण मावळ प्रांत तुमच्या नजरेसमोर येतो.
तिकोना किल्ल्यावर कसे जायचे ?
बेडसे लेणी मार्गे
अनेक ट्रेकर्स लोहगड, विसापूर, बेडसे लेणी आणि तिकोना असा एकाच वेळी ट्रेक करतात. तुम्ही बेडसे लेणीला भेट देऊन तिकोनापेठेतून सुरुवात करू शकता.ब्राम्हणोली मार्गे
अनेक ट्रेकर्स तुंग आणि तिकोना असा एकत्रित ट्रेक करतात. यासाठी तुम्हाला प्रथम तुंग किल्ला पाहून तुंगवाडीत उतरावं लागेल आणि मग केवरे गावी जावं लागेल. केवरे गावातून तुम्हाला लाँचने तिकोना नदी पार करून ब्राम्हणोली गावी पोहोचावं लागेल. ब्राम्हणोली ते तिकोनापेठ हे अंतर ३० मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर आहे.तिकोनापेठ मार्गे
तिकोना पेठ या गावातून, तिकोना किल्ल्यावर जाण्यासाठी प्रमुख मार्ग आहे.
त्या करता तुम्हाला कामशेत स्टेशन वर उतरावे लागेल. कामशेत ते काळे कॉलनी ही बस पकडून काळे कॉलनी मध्ये उतरावे लागेल. कामशेत ते काळे कॉलनी साठी बस किंवा जीप सेवा उपलब्ध आहे. काळे कॉलनी ते तिकोनापेठ हि सुद्धा बस व जीप सेवा आहे. या बसने वा जीपने तुम्हाला तिकोनापेठ गावं गाठावे लागेल. सकाळी ८:३० वाजता कामशेत येथून सुटणारी पौंड बस तुम्हाला थेट तिकोनापेठला घेऊन जाईल. तुम्ही कामशेत ते मोर्से बस पकडू शकता बस तुम्हाला तिकोनापेठला घेऊन जाईल. तिकोनापेठेतून किल्ल्यावर पोहोचण्यासाठी ४५ मिनिटे लागतात. वाट फारशी कठीण नाही आणि चालणे सोपे आहे. किल्ल्याच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक वाट आहे ज्याद्वारे तुम्ही २० मिनिटांत बालेकिल्ला गाठू शकता.