Skip to content

कसबा गणपती माहिती मार्गदर्शन | Kasba Ganpati Information Guide in Marathi

  • by
मंदिराचे नावकसबा गणपती
मंदिराचे ठिकाणपुणे

कसबा गणपती माहिती मार्गदर्शन | Kasba Ganpati Information Guide in Marathi

कसबा गणपती संक्षिप्त माहिती पुण्यातील लाल महल आणि शनिवारवाड्याच्या जवळच सुप्रसिद्ध कसबा गणपती आहे. पुण्याची ग्रामदेवता तसेच पुण्यातील पहिला मानाचा गणपती म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. कसबा पेठ ही पुण्याची प्राचीन वस्ती आहे. येथून पुढे पुणे शहर पसरत गेले. कर्नाटकातून आलेल्या ठकार कुटुंबाने कसबा गणपतीची स्थापना केली. आणि पुढे जिजामाता म्हणजे छत्रपती शिवरायांच्या आऊसाहेब यांनी येथे मंदिर बांधून जीर्णोद्धार केला. या मंदिराला जयंती गणपती मंदिर असेही म्हणतात कारण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारी पूर्वी याच गणपतीचे दर्शन घेत असत.आजही घरात होणाऱ्या कोणत्याही शुभ कार्याची लग्नाची पत्रिका ही येथील मंदिरास अर्पण केली जाते. आणि नंतर शुभकार्य झाल्यानंतर वधू वरास या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणले जाते. या गणपतीला पुण्यात पहिला पूजेचा मान आहे. पुण्यातील पाच मानाचा गणपती पैकी हाच पहिला मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे.

कसबा गणपती पाहण्यासारखी ठिकाणे

  1. कसबा पेठ प्रवेश कमान आणि आजूबाजूचा परिसर

  2. ग्रामदैवत कसबा गणपती मुख्य प्रवेशद्वार

  3. गणपती बाप्पा

  4. मंदिराच्या आवारात

    मंदिराच्या आत वाड्या सारखी रचना आहे आणि यातील प्रत्येक खांबावर अष्टविनायकाचे सुंदर असे छायाचित्र आहे.

  5. हनुमानाचे मंदिर आणि दीपस्तंभ

    कसबा मंदिराच्या आत मध्ये हनुमानाची छोटेसे सुंदर मंदिर आणि त्याच्या शेजारी दीपस्तंभ आहे.

  6. भिंतीवरील गणरायाच्या रूपाची छायाचित्रे

    आतमध्ये आल्यावर समोरच भिंतीवर आपल्याला गणपतीची वेगवेगळी रूपातील सुंदर अशी छायाचित्रे पहायला मिळतात.

कसबा गणपती कसे जायचे ?

  • खाजगी वाहनाने / सार्वजनिक वाहतूक
    खाजगी वाहनाने किंवा बसने तुम्ही कसबा पेठ पर्यंत जाऊ शकता. तेथून कसबा गणपती जवळ आहे.

कसबा गणपतीचा नकाशा / गुगल नकाशा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत