Remembering the great Shivaji Maharaj on his birth anniversary. ShivJayanti Status
छत्रपती शिवराय दैवत माझे,
असे एकच होऊन गेले,
इतिहासाच्या पानापानांत,
आपले नाव कोरून गेले.
◉◉◉◉◉
स्थापूनी हिंदवी स्वराज्य आपुले,
शौर्याने लिहिली इतिहास गाथा.
असे आमचे शिवबाराजे,
त्यांच्या चरणी ठेवितो माथा.
◉◉◉◉◉
प्राणपणाने लढून राजे,
तुम्ही जिंकले किल्ले.
दुश्मनाचे सदा परतुनी,
तुम्ही लावले हल्ले.
धर्मरक्षणासाठी घेतला,
जन्म जिजाऊंच्या पोटी.
हे शिवराय तुम्हा प्रणाम कोटी कोटी.
◉◉◉◉◉
हर हर महादेव आवाज सुटला,
मुघलांच्या कपाळावर घाम सुटला.
मावळ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी,
मुघल पळती माघारी.
शिवबा राजे तुम्ही अजून काही वर्षे जगला असता तर मुघलांनी देखील हातामध्ये भगवाच धरला असता
◉◉◉◉◉
घासल्याशिवाय धार नाही,
तलवारीच्या पातीला.
शिवबांशिवाय पर्याय नाही,
महाराष्ट्राच्या मातीला.
◉◉◉◉◉
तलवारी तर सर्वांच्याच हातात होत्या,
ताकत तर सर्वांच्याच मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापन करण्याची जिद्द
फक्त आणि फक्त शिवरायां मध्येच होती
◉◉◉◉◉
भगवे आमचे झेंडे,
आणि भगवे आमचे रक्त,
फक्त आणि फक्त,
आम्ही शिवरायांचे भक्त.
◉◉◉◉◉
नाही लाभणार राजे,
शिवबांन सारखे आम्हाला,
म्हणून कळकळीने सांगतात सर्व,
राजे तुम्ही पुन्हा या जन्माला.
◉◉◉◉◉
गगनभेदी नजर ज्यांची,
पहाडासम विशाल काया,
धगधगता सूर्य झुकतो,
वंदितो प्रभू शिवराया.
◉◉◉◉◉
आले किती गेले किती,
उडून गेले भरारा,
संपला नाही आणि संपणार नाही,
माझ्या शिवबांचा दरारा.
◉◉◉◉◉
यवनांच्या आक्रमणाची,
याद आहे अजूनही ताजी,
गनिमाच्या उरावर नाचले होते,
शूरवीर छत्रपती शिवाजी.
◉◉◉◉◉
हिंदू धर्म राखिले,
स्वराज्य स्वप्न साकारिले,
गर्जुनिया केला स्वराज्य सोहळा साजरा,
छत्रपती शिवाजी राजे,
तुम्हा मानाचा मुजरा.
◉◉◉◉◉
विजेसारखी तलवार चालवून गेलात,
निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेलात,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडून गेलात,
मुठभर मावळ्यांना घेऊन.
हजारो गनिमांना नडून गेलात.
शिवबाराजे तुम्ही रयतेच्या हृदयावर राज्य करून गेलात.
◉◉◉◉◉
छाती होती पोलाद ज्यांची,
डोळ्यात त्यांच्या अंगार,
मोगलांचा उडाला थरकाप,
पाहुनी शिवबांची तलवार.
◉◉◉◉◉
Shivjayanti Status, Charolya
◉◉◉◉◉
कापल्या जरी आमुच्या नसा,
तरी उधळण होईल भगव्या रक्ताची,
आणि फाडली जरी आमुची छाती,
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची.
Happy Shivjayanti
◉◉◉◉◉
जिथे शिवभक्त उभे राहतात,
तिथे बंद पडते भल्याभल्यांची मती,
मरणाला कुणाची भीती,
आदर्श आमचे शिवछत्रपती.
◉◉◉◉◉
सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर व शत्रूंचे मर्दन,
हीच आम्हा मावळ्यांना,
छत्रपती शिवरायांची शिकवण.
◉◉◉◉◉
ना भूमीच्या तुकड्यासाठी,
ना सोन्याच्या सिंहासनासाठी,
छत्रपती शिवराय लढले,
फक्त रयतेच्या सुखासाठी.
◉◉◉◉◉
आणखी Shivjayanti Status | शिवजयंती स्टेटस साठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा.