| किल्ल्याचे नाव | अजमेरा किल्ला |
|---|---|
| समुद्रसपाटी पासून उंची | 2854 |
| किल्ल्याचा प्रकार | गिरीदुर्ग |
| ट्रेकिंगची सोपेपणा-कठीणपणाची पातळी | मध्यम |
| किल्ल्याचे ठिकाण | नाशिक |
| पायथ्याजवळचे गाव | |
| जाण्यासाठी उत्तम कालावधी | अजमेरा किल्ला भेटीसाठी उत्तम काळ ऑगस्ट ते फेब्रुवारी आहे. |
| ट्रेकिंग ला लागणारा वेळ | पहाडेश्वर (अजमेर सौंदाणे) गावापासून अजमेरा किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतात. |
| प्रवेश शुल्क | |
| राहण्याची सोय | अजमेरा किल्ल्यावर राहण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. |
| जेवणाची सोय | अजमेरा किल्ल्यावर जेवणाची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. तुम्हाला सटाणा शहरात जेवण करावे लागेल. |
| पाण्याची सोय | अजमेरा किल्ल्यावर पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. तुम्हाला पहाडेश्वर मंदिरातून पाणी भरून घ्यावे लागेल. मंदिरातून पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. |
अजमेरा किल्ला माहिती मार्गदर्शन | Ajmera Fort Information Guide in Marathi
अजमेरा किल्ला संक्षिप्त माहिती नाशिक जिल्ह्यातील बागलाण हा प्रदेश अनेक ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये साल्हेर, सालोटा, मुल्हेर, पिसोळ आणि डेरमाळ हे भव्य किल्ले आणि कर्हा, बिष्टा, अजमेरा आणि दुंधाहे लहान किल्ले समाविष्ट आहेत.. सटाणा तालुक्यातील दुंधेश्वर डोंगररांगेवर हे चार किल्ले एका रांगेत आहेत आणि पूर्वी चौकी म्हणून वापरले जात होते.
खाजगी वाहनाने दोन दिवसात तुम्ही या चारही किल्ल्यांसोबतच देवळाणे गावातील जोगेश्वर मंदिरही व्यवस्थितपणे पाहू शकता.
सकाळी कोटबारी गावात पोहोचा. हे गाव बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे.
गावातून गाईड घेऊन बिष्टा किल्ला पहा. किल्ल्यावर जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी ४ ते ५ तास लागतात.
बिष्टा किल्ला पाहून झाल्यावर जेवण करा आणि कर्हा किल्ला पहा. या किल्ल्यालाही तुम्ही गाईड घेऊ शकता. पायथ्यापासून कर्हा किल्ला पाहून परत येण्यासाठी ३ तास लागतात.
कर्हा किल्ला पाहून झाल्यावर देवळाणे येथील जोगेश्वर मंदिराला भेट द्या.
महादेवाचे दर्शन घ्या आणि दुंधा किल्ला गाठा. किल्ला पाहण्यासाठी एक तास लागेल.
दुंधा किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करा किंवा पहाडावर जाऊन अजमेरा किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करा. यापैकी कुठेही जेवणाची सुविधा नाही, त्यामुळे सोबत स्वतःचे जेवण घेऊन जा.
अजमेरा किल्ला पाहण्यासारखी ठिकाणे
पहाडेश्वर मंदिर:
अजमेर सौंदाणे गावातून ४ किमी अंतरावर पहाडेश्वर मंदिर आहे. मंदिरात दर्शन घेऊन आणि पाणी भरून घेऊन मंदिराच्या परिसराच्या बाहेर यामाऊली आणि म्हसोबा:
मंदिराच्या कपाऊंडला लागून एक कच्चा रस्ता आहे जो डोंगराला लगटून पुढे जातो. या रस्त्याने १० मिनिटे चालत गेल्यावर उजव्या बाजूला तुम्हाला पत्र्याची शेड दिसेल. त्यात शेंदुराने सजवलेला आणि त्रिशुळ कोरलेला विशाल खडक.. त्याला माऊली म्हणून ओळखले जाते. डाव्या बाजूला एक खडक आहे त्याला म्हसोबा म्हणतात.गुहा आणि डोंगरदेव:
म्सोबाच्या मागे असलेल्या डोंगराच्या अर्ध्या उंचीवर गुहा आहेत. त्यात आदिवासींचा डोंगरदेव आहे. डाव्या बाजूला अजमेरा किल्ल्याचा डोंगर आणि उजव्या बाजूला डोंगदेवाचा डोंगर ठेवून पायवाट पुढे दाट झाडीत शिरते.डोंगरावर चढाई:
झाडीतून १० मिनिटे चालत गेल्यावर, आपण डोंगरांच्या मध्ये असलेल्या एका खडतर खिंडीतून आपण आपली वाटचाल सुरू करतो. साधारण अर्ध्या ते पाऊण तासात आपण किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशद्वारापाशी पोहोचाल.गडप्रवेश आणि गडमाथा:
प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला उध्वस्त बुरुजाचे आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतील. गडावर प्रवेश केल्यावर तुम्हाला प्रशस्त गडमाथा दिसतो. प्रवेशद्वाराच्या विरुद्ध बाजूला उंचावर झेंडा लावलेला दिसतो.झेंडा आणि उध्वस्त वास्तू:
झेंड्याच्या दिशेने वाटचाल सुरू करताच उजवीकडे एक उंचवटा दिसतो. त्यावर उध्वस्त वास्तूंचे अवशेष पसरलेले आहेत. तर डावीकडे एक कोरडा तलाव डोळ्यात भरतो.महादेव मंदिर आणि तलाव
पायवाटेने पुढे सरळ गेल्यावर उजव्या बाजूला महादेवाचे उध्वस्त मंदिर आहे. या ठिकाणी नंदी आणि पिंड आहे. महादेवाचे दर्शन घेऊन पुढे सरकताच उजवीकडे दुसरा तलाव दिसून येतो.पाण्याची टाकी आणि गडमाथा:
तलाव पाहून पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूला दोन पाण्याची टाकी आहेत. त्यातील एक टाकी बुजलेले असून दुसरे टाके पाण्याने भरलेले आहे पण पाणी पिण्यायोग्य नाही. टाकी पाहून गडाच्या टोकावरील उंचवट्यावर असलेल्या झेंड्यापाशी पोहोचावे. झेंड्यापासून आजूबाजूचा परिसर, कर्हा आणि बिष्टा हे किल्ले दिसतात. गडमाथा फिरण्यास अर्धा तास लागतो.
अजमेरा किल्ल्यावर कसे जायचे ?
अजमेरा किल्ला, नाशिक जिल्ह्यातील बागलाण प्रदेशात दुंधेश्वर डोंगररांगेवर वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. पहाडेश्वर मंदिरा जवळून सुरू होणाऱ्या ट्रेकिंग मार्गाद्वारे तुम्ही अजमेरा किल्ल्यावर सहज पोहोचू शकता.
मुंबईहून नाशिक मार्गे सटाणा
मुंबई ते नाशिक आणि नाशिक ते सटाणा गाठावे. सटाणा-अजमेर सौंदाणे रस्त्यावरून अजमेर सौंदाणे गावात जा. अंतर सुमारे 8 किमी आहे. अजमेर सौंदाणे गावातून तुम्हाला पहाडेश्वर मंदिराला जाणारा रस्ता दिसेल. हे अंतर 4 किमी आहे आणि चालत जायला सुमारे 1 तास लागतो. पहाडेश्वर मंदिर हा अजमेरा किल्ल्याचा पायथा आहे. मंदिरापासून तुम्ही किल्ल्यावर ट्रेकिंग सुरू करू शकता.