| किल्ल्याचे नाव | सप्तश्रुंगी किल्ला |
|---|---|
| समुद्रसपाटी पासून उंची | 4600 |
| किल्ल्याचा प्रकार | गिरीदुर्ग |
| ट्रेकिंगची सोपेपणा-कठीणपणाची पातळी | मध्यम |
| किल्ल्याचे ठिकाण | नाशिक |
| पायथ्याजवळचे गाव | |
| किल्ल्याची वेळ | |
| ट्रेकिंग ला लागणारा वेळ | नांदुरी गावातून किल्ल्यावर पोहोचण्यासाठी अर्धा तास लागतो. |
| प्रवेश शुल्क | |
| राहण्याची सोय | किल्ल्यावर धर्मशाळा आहेत जिथे तुम्ही राहू शकता. |
| जेवणाची सोय | किल्ल्यावर अनेक हॉटेल्स आणि भोजनालये आहेत. |
| पाण्याची सोय | किल्ल्यावर वर्षभर पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध असण्यासाठी टाके बांधण्यात आले आहेत. |
सप्तश्रुंगी किल्ला माहिती मार्गदर्शन | Saptashrungi Fort Information Guide in Marathi
सप्तश्रुंगी किल्ला संक्षिप्त माहिती नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेमध्ये वसलेला सप्तश्रुंगी गड हा वणीचा डोंगर या नावानेही ओळखला जातो. जगदंबेचे हे प्रसिद्ध देवस्थान महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. सात आदिमातांमधील थोरली माता असलेली ही देवी अत्यंत जागृत मानली जाते आणि तिच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
सप्तश्रुंगी किल्ला पाहण्यासारखी ठिकाणे
वणीची देवीचे भव्य मंदि
किल्ल्यावर जगदंबा मातेचे, म्हणजेच वणीच्या देवीचे, भव्य मंदिर आहे. हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे आणि भाविकांची येथे मोठी गर्दी असते. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्यांची सोय आहे.गडावर जाण्यास बंदी
मंदिराच्या वरच्या बाजूला गड आहे. श्रद्धेच्या भावनेमुळे सध्या गडावर जाण्याची परवानगी नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
सप्तश्रुंगी किल्ल्यावर कसे जायचे ?
नांदुरी गावातून
नांदुरी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. वणी आणि नांदुरी दर अर्ध्या तासाला बसेस चालतात. शिकमधून थेट जीपनं नांदूर गाठून किल्ल्यावर जाता येते.